अहील्यानगर दि.३१ प्रतिनिधी
महीलांच्या सक्षमीकरणा करीता केंद्र आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या योजना मागे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांची प्रेरणा असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती दिनाच्या निमिताने मंत्री विखे पाटील यांनी पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या मुख्य कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर शहराचे अध्यक्ष अनिल मोहिते याप्रसंगी उपस्थित होते.
धर्म रक्षणाबरोबरच जनकल्याण आणि स्त्री सन्मानाला अहील्यादेवी होळकर यांचे प्राधान्य होते.महीला अर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या पाहीजेत या उद्देशाने महेश्वर येथे कुशल विणकरांच्या माध्यमातून हातमाग व्यवसायाला पाठबळ दिले.ही केवळ वस्त्रनिर्मीती नव्हती तर महीलांचा स्वाभीमान रोजगार आणि आत्मनिर्भरतेची सुरूवात होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात योजनांच्या माध्यमातून सुरू झालेल्या महीलांच्या सक्षमीकरणाच्या कार्यामागे अहील्यादेवीच्या विचारांची प्रेरणा असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकराने महीलांकरीता मोठ्या प्रमाणात योजना सुरू केल्या.अहील्यानगर जिल्ह्यात शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.परंतू त्यापुढे जावून एकल महिलांना पाठबळ देण्यासाठी सुरू झालेल्या योजनेमुळे एकल महीलांना कौशल्या प्रशिक्षणाच्या संधी मिळाल्या आहेत.अनेक महीलांचे प्रशिक्षण पूर्ण होवून त्यांना रोजगार निर्माण झाला.आशा पध्दतीची योजना सुरू करणारा अहील्यानगर जिल्हा एकमेव असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
तिर्थक्षेत्रांच्या विकासाचा एक आदर्श अहील्यादेवीनी आपल्या कारकिर्दीत निर्माण केला.मंदीराचा जिर्णोध्दार घाटांचा विकास विहीरीची निर्मिती ही देशाच्या सांस्कृतिक परंपरेची प्रतिक असून जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापनाचे उतम उदाहरण ठरले आहे.यातुन देशाच्या सांस्कृतिक एकात्मतेला बळकटी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
तिनशेव्या जयंतीच्या निमिताने जलसंपदा विभागाच्या वतीने अहील्यादेवीच्या विचारांची प्रेरणा घेवून काढण्यात आलेली गोदा ते नर्मदा जलयात्रा धर्म संस्कृती आणि पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी होती.यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश मधील सांस्कृतिक परंपरेचा वारसा अधिक घट्ट झाला आहे.