राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : जिल्हा परिषद शाळेच्या रंगकामासाठी तसेच अंगणवाडीच्या सुरक्षा कंपाऊंडसाठी अपर्णा बानकर आणि प्रसाद बानकर यांनी एक लाख रुपयांची देणगी दिली. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) विमा ग्राम स्पर्धेत मिळालेली बक्षीस रक्कम समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करत बानकर दाम्पत्याने सामाजिक बांधिलकी जपली.
अपर्णा बानकर या एलआयसीच्या विमा सल्लागार असून, विमा ग्राम स्पर्धेत मिळालेल्या बक्षीस रकमेतून त्यांनी शाळेला विविध शैक्षणिक साहित्य, खेळणी तसेच आवश्यक वस्तूंचे वाटप केले. यापूर्वीही त्यांनी शाळेला विविध साहित्य आणि रोख स्वरूपात मदत केली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या योगदानाबद्दल शाळेच्या वतीने अपर्णा बानकर व प्रसाद बानकर यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला.
यावेळी लोकनियुक्त सरपंच सुवर्णा बानकर, उपसरपंच महेंद्र तांबे, ग्रामपंचायत सदस्य भानुदादा मोकाटे, अनिल ठुबे, शिक्षक निवृत्ती धुमाळ, मुख्याध्यापक विजय कांडेकर, कांडेकर मॅडम, केंद्रप्रमुख ढोकणे सर, अंगणवाडी पर्यवेक्षिका पाटील मॅडम, कोमल मोरे, शिवनाथ वाकडे, दिगंबर पटारे, अजय हापसे, ग्रामविकास अधिकारी शेटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वांढेकर सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन वांढेकर मॅडम यांनी मानले.