राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे – शिर्डी येथे ओमसाई विकास प्रतिष्ठाण व बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा मानाचा महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार राहुरी येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.रोहिणी शंकर आंबेकर यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार सोहळा – २०२६ चे दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार सोहळा समितीचे अध्यक्ष सुदाम संसारे, उपाध्यक्षा सौ.विद्या ठाकुर-कुंजीर, जिल्हा इमारत व इतर बांधकाम संघटनेचे सरचिटणीस नंदुजी डहाणे, सौ.वैशाली सोनवणे, उद्योजक किशोर शेठ कालडा, प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड, समाजभूषण उत्तम घोगरे, ॲड.सतिषचंद्र सुद्रिक, दिलीप वाघ, सुमनताई देसाई, लतेश्वरी काळे, सुरज कालडा, डॉ.सुरेश गुहवे, डॉ.जितेंद्र पाटील, कार्याध्यक्ष राजेश काळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार प्राप्त करण्यात आला.
यावेळी राहुरी तालुका बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब जगधने, अनिल हापसे, प्रकाश आंबेकर, प्रवीण कांबळे, आकाश वायाळ, ओंकार वायळ, फारुख शेख, दादा तिजोरे आदी उपस्थित होते. सौ.रोहिणी शंकर आंबेकर यांनी जिल्हा परिषदेच्या बारागाव नांदूर गटात बांधकाम कामगारांच्या विविध प्रकारच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम केले आहे. त्यांच्या या विशेष कार्याची दखल घेऊन त्यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांचे पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजी खा.डॉ.सुजय विखे पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अक्षय शिवाजीराव कर्डिले, माजी जि.प.सदस्य विक्रम तांबे, भाजपा तालुका अध्यक्ष सुरेशराव बानकर, जिल्हा सरचिटणीस अमोल भनगडे, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष पत्रकार विनीत धसाळ आदींसह अनेकांनी अभिनंदन केले आहे.