अहिल्यानगर : क्षत्रिय कुमावत समाजसेवा संघाच्या वतीने परमपूज्य ह.भ.प. गुरुवर्य महामंडलेश्वर १००८ ज्ञानेश्वर माऊली महाराज (बेलदारवाडी) यांच्या पायी दिंडीचे अहिल्यानगरमध्ये भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात स्वागत करण्यात आले. हजारो वारकरी, भाविक, सेवेकरी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा जल्लोषात पार पडला.
यावेळी भारतीय गुप्तचर विभागाचे कमांडिंग ऑफिसर चंद्रशेखरजी, गॅरिसन इंजिनियर लामखने, अभियंता विकास जाधव, मेजर संपत शिंदे यांच्यासह लष्करी अधिकारी उपस्थित होते.
दिंडी सोहळ्याचे सूत्रसंचालन कु. अश्विनी अरुण छल्लारे यांनी केले. महाप्रसाद व्यवस्थेची जबाबदारी अवधूत कुकडवाल, सागर कुकडवाल, प्रतीक कुकडवाल, संजय कुकडवाल, प्रवीण परदेशी, पुरुषोत्तम छल्लारे, महेश छल्लारे, प्रा. डॉ. अमरनाथ कुमावत, मुकुंद परदेशी, कडुबाळ परदेशी, श्रीकांत नाईक, नितीन बेलदार, राजेंद्र राजवाळ, श्री कामे, दीपक परदेशी, महादेव घाटेवाळ, पत्रकार राजेंद्र परदेशी यांच्यासह समाजातील कार्यकर्त्यांनी यशस्वीपणे सांभाळली.
वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत डॉ. अनिल कुऱ्हाडे, डॉ. बागल आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने मोफत वैद्यकीय सेवा दिली. तसेच ऋषिकेश कुक्कडवाल यांनी आवश्यक वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देत सेवाकार्यात मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे ज्ञानदा आर्ट यांनी साकारलेली भव्य रांगोळी. या कलाकृतीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. समाजातील महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत संपूर्ण परिसर भक्तिमय केला.
यावेळी ज्ञानेश्वर माऊली महाराज यांनी भागवती एकादशीचे आध्यात्मिक महत्त्व विषद करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्या निरूपणाने भाविक मंत्रमुग्ध झाले. एकादशीचे औचित्य साधून सर्व वारकरी आणि भाविकांसाठी फराळाच्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्षत्रिय कुमावत समाजसेवा संघाने सर्व भाविक, वारकरी, स्वयंसेवक, महिला भगिनी आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.