पत्रकार विनीत धसाळ यांना मातृशोक

राहुरी : राहुरी तालुक्यातील तांदूळवाडी येथील रहिवासी वत्सलाबाई आनंदराव धसाळ यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने धसाळ कुटुंबासह तांदूळवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्यावर सोमवार (दि. १३ जुलै) रोजी सकाळी ९ वाजता तांदूळवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्या शंकर धसाळ व रायभान धसाळ यांच्या मातोश्री, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार विनीत धसाळ यांच्या आई, तसेच पृथ्वीवीर ॲग्रो फार्मचे संचालक अमोल धसाळ यांच्या आजी होत.

त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, मित्रपरिवार व परिसरातील नागरिकांनी शोक व्यक्त केला असून धसाळ कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

One thought on “पत्रकार विनीत धसाळ यांना मातृशोक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *