नव्या युगाची नवी फॅशन; ‘साई वन ग्रॅम गोल्ड अँड इमिटेशन ज्वेलरी’चे दिमाखात उद्घाटन

राहुरी : नव्या युगाची नवी फॅशन आणि महिलांसाठी आकर्षक दागिन्यांचे खास कलेक्शन घेऊन आलेल्या ‘साई वन ग्रॅम गोल्ड अँड इमिटेशन ज्वेलरी’ या नवीन दालनाचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.

श्रीक्षेत्र सरला बेटचे मठाधिपती ह.भ.प. हिंदू धर्मरक्षक महंत स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते फीत कापून या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष ताराचंद पाटील तनपुरे अध्यक्षस्थानी होते.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर ताराचंद पाटील तनपुरे ,ह.भ.प. मधुकरजी महाराज, प्रभाकर भाऊ म्हसे, मोहन महाराज सिनारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना महंत रामगिरीजी महाराज यांनी म्हसे परिवाराचा श्रीक्षेत्र सरला बेटशी तीन पिढ्यांपासून असलेला ऋणानुबंध अधोरेखित केला. सध्या सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने महिलांनी वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरीचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. या दागिन्यांना सोन्यासारखी चमक असून, ते दिसायला आकर्षक आणि तुलनेने किफायतशीर असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, साई वन ग्रॅम गोल्ड अँड इमिटेशन ज्वेलरीच्या संचालिका वृषाली म्हसे यांनी दुकानात विविध प्रकारची इमिटेशन ज्वेलरी, वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी, कॉस्मेटिक्स, पर्स आणि नाविन्यपूर्ण दागिन्यांचे कलेक्शन उपलब्ध असल्याची माहिती दिली.

उद्घाटनानिमित्त ५ ते ८ ऑक्टोबरदरम्यान ५०० रुपयांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मंगळसूत्र मोफत भेट देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

उद्घाटन सोहळ्यास चंद्रकांत म्हसे, सुभाष म्हसे, पांडुरंग म्हसे, संजय देवरे, निंभरेचे सरपंच शांताराम सिनारे, उपसरपंच सुभाष सिनारे, शुभम सोनवणे, प्रसाद म्हसे, गौरव म्हसे, संकेत पवार ,नगरसेविका वृषाली नंदकुमार तनपुरे, कांता शेठ तनपुरे व मित्रमंडळ  आदींसह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.

यावेळी दुकानाल भेट देण्यसाठी नागरिक आणि महिलांची मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निकीता सुदर्शन म्हसे यांनी केले. सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे यांनी केले, तर आभार वृषाली कैलास म्हसे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *