अहिल्यानगर : विळदघाट येथील मातोश्री वृद्धाश्रमात वृद्धांवर काठीने हल्ला करून दोघांचा खून केल्याच्या प्रकरणातील आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेत अटक केली. राजू तुकाराम घुले (वय ५४, रा. मातोश्री वृद्धाश्रम, विळदघाट) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास वृद्धाश्रमात ही घटना घडली. आश्रमातील लोक आपली चेष्टा करतात, या कारणावरून राजू घुले याने वृद्धांना चालण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या काठीने मारहाण केली. या हल्ल्यात संतोष पिरंगळ, लिबराज फिसके, साहेबराव भवर, बाळासाहेब घाडगे, गोरख फुंदे, गणेश घोडके, दत्तात्रय हारके आणि मंकाळेश्वर हेने हे आठ जण जखमी झाले.
यातील दत्तात्रय हारके आणि मंकाळेश्वर हेने यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी दिलीप मांगीलाल चोरडिया यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ११८(२) व ११५(२) अन्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी राजू घुले याला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात करीत आहेत.
ही कारवाई मुम्मका सुदर्शन सो. पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, वैभव कलुबमें सो अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, शिरीष वमने सो, उप विभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग, अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि हेमंत थोरात, प्रभारी अधिकारी, एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन, पोसई अजय कोटे, पोसई खिळदकर, सफो. राकेश खेडकर, पोहेका नरोटे, पोहेकों फोलाणे, पोहेकों रोहोकले, पोहेको सुद्रीक, पोहकों खेडकर, पोना पालवे, पोकों फुंदे, पोकों सुरज देशमुख, पोकों दहिफळे, पोकों जाधव, पोकों केदार, पोकों खेडकर, पोकों हरदास, पोकों गवारे यांनी केली आहे.