विचारवंत हनुमंत पवार यांचे व्याख्यान; पत्रकारांच्या समस्यांवर होणार चर्चा
राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा अधिवेशनानिमित्त रविवार (दि. २०) चिंचोली शिवारातील केशव फार्म येथे पत्रकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध विचारवंत हनुमंत पवार यांचे ‘लोकशाही राष्ट्रात ग्रामीण पत्रकारांची भूमिका’ या विषयावर व्याख्यान होणार असून, ग्रामीण पत्रकारांच्या विविध समस्या आणि त्यावरील उपाययोजनांवर चर्चा करण्यात येणार आहे.
नगर-मनमाड महामार्गालगत चिंचोली शिवारातील केशव फार्म येथे होणाऱ्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी चिंचोलीच्या सरपंच शोभाताई लाटे राहणार आहेत. यावेळी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि पत्रकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या पत्रकारांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, पत्रकारितेतील आव्हाने आणि लोकशाही व्यवस्थेत ग्रामीण पत्रकारांची भूमिका यावर मेळाव्यात विचारमंथन होणार आहे. तसेच चिंचोली परिसरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार हेमंत ओगले, नाशिकचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रमोद वाघ, श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार, कोल्हारचे सरपंच सुरेंद्र खर्डे, राहुरीचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, ज्येष्ठ पत्रकार प्रभंजन कनिंगध्वज, प्रदेश सचिव शरद तांबे, पत्रकार राजेश जाधव, किशोर गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे राहुरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण भोसले व सचिव राजेंद्र म्हसे यांनी जिल्ह्यातील पत्रकारांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
मेळाव्याच्या आयोजनासाठी राहुरी तालुकाध्यक्ष अशोक मंडलिक, राहाता तालुकाध्यक्ष सुभाष कोंडेकर, प्रमोद डफळ, बाळासाहेब दातीर, सचिव, उपाध्यक्ष दीपक मकासरे, अशोक कर्डे (सर), राजेंद्र पवार, रमेश जाधव, जावेद शेख, दिनेश गायकवाड, राजेंद्र परदेशी, अनिकेत विधाटे, देवेंद्र शिंदे, मनोज साळवे, मधुकर म्हसे, वसंत भोसले, सोमनाथ वाघ, दीपक साळवे, समीर शेख, युनुस शेख व आप्पासाहेब मकासरे यांच्यासह पत्रकार बांधव प्रयत्नशील आहेत.