वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली खिस्ती समाजाच्या विविध प्रश्नांना व्यापक स्वरूप देऊन समाजाचा न्याय हक्कासाठी संविधानीक मार्गाने लढा उभारण्यासाठी हरेगाव येथे १९ सप्टेंबर रोजी दुपारी २वा खिस्ती हक्क संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे
ख्रिस्ती समाजाच्या विविध प्रश्नावर जनजागृती करण्याच्या उद्देशाने तसेच भारतीय संविधानाने दिलेल्या धर्म स्वातंत्र्य समानता व न्यायाच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर संबोधित करणार आहेत विशेषता चर्च व ख्रिस्ती धार्मिक संस्थांशी संबंधित जिल्हातील अनेक धार्मिक संस्था व चर्च यांना देण्यात आलेल्या नोटीसा तसेच समाजातील विविध प्रश्नावर चर्चा करण्यात येणार आहे
या खिस्ती परिषदेसाठी जिल्हाभरातील सकल ख्रिस्ती समाजात बांधवांनी युवक युवती तसेच चर्च प्रतिनिधी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचा राज्य प्रवक्ता उत्कर्षा ताई रुपवते दिशा ताई शेख उत्तर नगर जिल्हाध्यक्ष संतोष चोळके महासचिव मधुकर साळवे जिल्हा सचिव सुनील बाम्हणे जिल्हा संपर्कप्रमुख पिंटू नाना साळवे जिल्हा प्रवक्ते अनिल जाधव प्रबुद्ध भारत चे जिल्हा प्रतिनिधी आप्पासाहेब मकासरे राहुरी तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव राहुरी शहराध्यक्ष ऋषिकेश साळवे यांच्या सह वंचित बहुजन आघाडी जिल्हा व तालुका सर्व कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.