मोफत नेत्र व दंत तपासणीला प्रतिसाद; गरजू रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन
राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : येथील श्री संत गाडगे महाराज आश्रमशाळेत कै. तुळसाबाई विठ्ठल सूर्यवंशी यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिराचे उद्घाटन राहुरी नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक सागरदादा कैलास तनपुरे होते. नगरसेवक रविंद्र आहेर, अरिफभाई शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश लबडे, जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख, शहराध्यक्ष जुबेरभाई मूसानी, रविभाऊ भूजाडी, भरत आढाव, दत्तात्रय खेमनर, सुखदेव कीर्तने, बाबा तसेच सेवा निवृत्त मुख्याध्यापक गजानन खर्चे, आश्रमशाळेचे सुदाम दिघे, मीनाक्षी लोखंडे (खर्चे), ज्योती चतारे (माळी) यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
नेत्र रुग्णालयाच्या वतीने डॉ. अनिकेत घोलप, सिद्धार्थ नेहे आणि दंतरोगतज्ज्ञ डॉ. महेश इघे यांनी रुग्णांना सेवा दिली. शेवटी जगन्नाथ विठ्ठल सूर्यवंशी सर यांनी उपस्थित मान्यवर, डॉक्टर, प्रहार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी व रुग्णांचे आभार मानले.
कै. तुळसाबाई सूर्यवंशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या उपक्रमातून पुण्यस्मरणाला समाजसेवेची जोड मिळाली. गरजू नागरिकांना आरोग्य तपासणीचा लाभ मिळण्याबरोबरच दृष्टी व दंत आरोग्याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.