१०० कोटींच्या ठेवींचा टप्पा पार; अत्याधुनिक सुविधा, आर्थिक शिस्तीमुळे प्रेरणा मल्टीस्टेटची सातत्याने प्रगतीकडे वाटचाल : संस्थापक चेअरमन सुरेशशेठ वाबळे

राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : गेल्या १४ वर्षांच्या वाटचालीत काळानुरूप बदल स्वीकारत प्रेरणा मल्टीस्टेटने अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. संस्थेने १०० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पूर्ण केला असून आर्थिक शिस्तीमुळेच संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन संस्थापक चेअरमन सुरेश वाबळे यांनी केले.

प्रेरणा मल्टीस्टेटच्या चौदाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. वाबळे म्हणाले, संस्थेच्या सध्या आठ शाखा कार्यरत असून आगामी काळात गोव्यातील म्हापसा येथे लवकरच नवीन शाखा सुरू करण्यात येणार आहे. तसेच नगर शहर, केसनंद (वाघोली) आणि पुण्यातील भोसरी येथे शाखा सुरू करण्यासाठी संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. यंदा सभासदांना ११ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी सहकार कायद्यात केलेल्या नवीन सुधारणा तसेच सहकार विभागात झालेल्या बदलांमुळे संस्थांच्या कारभारात अधिक पारदर्शकता आली आहे. प्रेरणा मल्टीस्टेटच्या सर्व शाखांमध्ये लवकरच सभासदांना ऑनलाइन खात्यात पैसे जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे वाबळे यांनी सांगितले.

यावेळी अहिल्यानगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्य निधीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवाजीराव कपाळे, नगर जिल्हा सहकारी बँकेच्या सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळावर निवड झाल्याबद्दल बँकेचे वरिष्ठ अधिकारी संजय वर्पे, तसेच राहुरी येथील डॉ. आप्पासाहेब दुस यांची आरोग्य विभागातील वरिष्ठ पदावर पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

संस्थेचा वार्षिक अहवाल जनरल मॅनेजर अनिल वर्पे यांनी सादर केला. यावेळी चेअरमन सुजित वाबळे, साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजी कपाळे, संचालक विष्णुपंत वर्पे, दादासाहेब उऱ्हे, रविंद्र राऊत, राजेंद्र वर्पे, नंदकुमार दिघेसर, रावसाहेब शिंदे, अक्षय ओहळ, प्रेरणा पतसंस्थेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र हुरुळे, अशोक उर्हे, श्रीकांत जगधने, दिलीप जगताप, लक्ष्मण तांबे, नारायण जाधव, नंदकुमार भराडिया, रश्मित तरकसे, जगन्नाथ वरखडे, धनंजय दळे, संतोष खर्डे, उत्तमराव गाडे, सुरेश शिरसाठ, मदन गागरे, जगन्नाथ वर्पे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

संचालक प्रा. विशाल वाबळे यांनी स्वागत केले. मल्टीस्टेटचे उपाध्यक्ष प्रा. वेणूनाथ लांबे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *