८०-९०च्या दशकातील रेट्रो लुकमध्ये आमदार अक्षय कर्डिले; एआय फोटोची सोशल मीडियावर धूम

अहिल्यानगर :

 सध्या सोशल मीडियावर ८० आणि ९०च्या दशकातील रेट्रो लुकची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वतःचे छायाचित्र जुन्या काळातील पेहराव, वेशभूषा आणि स्टाईलमध्ये तयार करून ते सोशल मीडियावर शेअर करण्याचा ट्रेंड जोरात सुरू आहे. आता या रेट्रो लुकची भुरळ थेट राजकीय वर्तुळालाही पडली असून, राहुरी–नगर–पाथर्डी मतदारसंघाचे आमदार अक्षय कर्डिले यांचा ८०-९०च्या दशकातील अंदाजातील एआय फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.आमदार अक्षय कर्डिले यांचा हा रेट्रो अंदाजातील फोटो कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. जुन्या काळातील नेत्यांच्या छायाचित्रांची आठवण करून देणारा पेहराव, व्यक्तिमत्त्वाचा रुबाब आणि रेट्रो ढंगातील छायाचित्र यामुळे हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आकर्षक कॅप्शनसह हा फोटो कार्यकर्त्यांच्या विविध समाजमाध्यमांच्या खात्यांवर झळकत असून, त्यावर प्रतिक्रिया आणि कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. विशेष म्हणजे, एआय माध्यमातून काही क्षणांतच एखाद्या व्यक्तीचा लुक पूर्णपणे बदलता येत असल्याने तरुणाईमध्ये या तंत्रज्ञानाची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. ८०-९०च्या दशकातील चित्रपट, फॅशन आणि तत्कालीन नेत्यांच्या स्टाईलची झलक देणारे फोटो तयार करून ते सोशल मीडियावर टाकण्याचा नवा ट्रेंड सध्या जोर धरत आहे. याच ट्रेंडमध्ये आमदार अक्षय कर्डिले यांचा फोटोही चांगलाच चर्चेत आला आहे.कर्डिले यांच्या या रेट्रो लुकने कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले असून, जुन्या काळातील नेत्यांचा रुबाब अशीही चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे. त्यामुळे एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला हा फोटो सध्या आमदार कर्डिले मतदारसंघातील राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *