राहुरी वेब प्रतिनिधी,शरद पाचारणे : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालय, राहुरी येथे दहीहंडी उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांच्या जल्लोषाने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुणसाहेब तनपुरे, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी हर्षदादा तनपुरे तसेच संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र शिंदे आणि राहुरी नगरपालिकेचे नगरसेवक प्रतीक तनपुरे यांच्या पुढाकारातून या दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. आर. दळवी यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित दहीहंडी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत दहीहंडी उत्सवाचा आनंद लुटला.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन महाविद्यालयाचे प्रबंधक गणेशराव देशमुख, कार्यालय अधीक्षक प्रफुल्ल तनपुरे तसेच सर्व शिक्षकेतर सेवकांनी केले. यावेळी वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. अनिता वेताळ, डॉ. राजेंद्र गोसावी, क्रीडा संचालक प्रा. नितीन वाळूंज, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. मंजाबापू उऱ्हे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.