राहुरी फॅक्टरी दि. 22 ऑक्टो 26 –
अहिल्यानगर येथील तीन व्यापाऱ्यांना जमीन दाखवण्याच्या बहाण्याने राहुरी फॅक्टरी परिसरात बोलावून लुटल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे. या घटनेत अंदाजे दहा लाख रुपये लुटल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मारहाण झालेल्या व्यापाऱ्यांना वैद्यकीय उपचार मिळाले नसल्याने त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद न देताच अहिल्यानगर गाठल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या घटनेबाबत अधिकृत माहिती आणि पोलिसांकडून दुजोरा मिळणे बाकी आहे.