राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : देवळालीप्रवरा येथील ज्येष्ठ विधिज्ञ व काँग्रेसचे सक्रिय पदाधिकारी अॅड. प्रकाश संसारे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती (एससी) विभागाच्या कार्यकारी समितीच्या राज्य सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे देवळालीप्रवरा, राहुरी, श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
एससी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री आ. राजेंद्र पाल गौतम यांनी अॅड. संसारे यांच्या सामाजिक कार्याची, संघटन कौशल्याची आणि पक्षनिष्ठेची दखल घेत ही नियुक्ती जाहीर केली. राज्य सरचिटणीस या नात्याने अनुसूचित जाती समाजाच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देणे, पक्ष संघटना अधिक सक्षम करणे आणि राज्यभर पक्षाच्या विविध उपक्रमांना गती देण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
अॅड. संसारे यांच्या नियुक्तीबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, एससी विभागाचे प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध वनकर, खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, खासदार चंद्रकांत हांडोरे, आमदार हेमंत ओगले, श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, बाळासाहेब आढाव, बंटी यादव यांच्यासह देवळालीप्रवरा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांनी त्यांचे अभिनंदन केले.