लक्षवेध प्रज्ञाशोध परीक्षेत स्वरा विनीत धसाळ हिचे घवघवीत यश

राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : लक्षवेध फाउंडेशन संचलित तथा शासनमान्य लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा २०२६ मध्ये तांडुळवाडी येथील जि. प. प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कु .स्वरा विनीत धसाळ हिने ८४.६७ टक्के गुण मिळवत राहुरी केंद्रात चौथा क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

१५ फेब्रुवारी २०२६ रोजी मराठी माध्यमातून झालेल्या या परीक्षेत स्वराने उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या शाळेचे, पालकांचे आणि गावाचे नाव उज्ज्वल केले. सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या बळावर तिने हे यश संपादन केले.मुख्याध्यापिका श्रीमती संगीता बेदरे, शिक्षक रमेश घोडके सर यांचे मार्गदर्शन स्वराला लाभले.

स्वरा ही पत्रकार तसेच संजय गांधी निराधार योजनेचे राहुरी तालुका अध्यक्ष विनीत धसाळ यांची कन्या असून, तिच्या यशामुळे कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. स्वराच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वराच्या या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची प्रेरणा मिळणार असून, तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *