राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे :
साईदीप सह्याद्री हॉस्पिटलच्या वतीने आरोग्यविषयक शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी तसेच स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसाठी विशेष माहिती बैठक, स्नेहमेळावा आणि स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता राहुरी येथील पांडुरंग लॉन्स व मंगल कार्यालय, स्टेशन रोड येथे होणार आहे.
या कार्यक्रमात विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहून शासकीय आरोग्य योजनांची माहिती देणार आहेत. यामध्ये गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. इंद्रनील कुलकर्णी, न्युरोसर्जन डॉ. भूषण खबे, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ. शुभंकर देशपांडे, कार्डिओलॉजिस्ट डॉ. आलिन पॉल, युरोलॉजिस्ट डॉ. नीरज गांधी, कन्सल्टंट पल्मोनोलॉजिस्ट डॉ. गोकुळ बांधे तसेच साईदीप सह्याद्री हॉस्पिटलचे हॉस्पिटल डायरेक्टर डॉ. व्यंकटेश मुक्के यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
डॉ. सौ. चेतना कुलकर्णी व डॉ. जयंत शांताराम कुलकर्णी (कुलकर्णी हॉस्पिटल, राहुरी) यांनी या निमंत्रणास मान देऊन सर्वांनी उभयतांनी (जोडीने) कार्यक्रमास उपस्थित राहावे तसेच स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यावा, असे नम्र आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी ७३५०५ ६५३५६ या क्रमांकावर संपर्क साधावा.