आधार फाउंडेशन व एसआर 24 न्यूजचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा उद्या राहुरी कृषी विद्यापिठात

राहुरी : सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय तसेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आधार फाउंडेशन व एसआर २४ न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा – २०२६ चे आयोजन शनिवार, दि. १३ जून २०२६ रोजी  सकाळी ११ वाजता राहुरी कुषी विद्यापीठाचा डॉ आण्णासाहेब  शिंदे सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आयोजक तथा पत्रकार रमेश गंगाधर खेमनर यांनी दिली.

विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत राज्यभरातील निवडक मान्यवर व संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे. वैद्यकीय, प्रशासकीय, सहकार, सांस्कृतिक, सामाजिक, उद्योग, कृषी, पत्रकारिता, आरोग्य, आध्यात्मिक तसेच क्रीडा क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना या सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. आण्णासाहेब शिंदे सभागृहात संपन्न होणार आहे. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाषशेठ गुंदेजा हे राहणार आहेत. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेशजी लंके,  मा.पोलीस उपायुक्त रुक्मिणी गलांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप गोरड, भाजप ओबीसी मोर्चाच्या महिला संयोजिका उज्वला हाके, राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अरुण तनपुरे खेड पंचायत समितीचे सभापती अरुण चौधरी, राहुरी नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, आदर्श संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे, शिवसेना शेतकरी सेनेचे रवींद्र मोरे, पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब हंडाळ, शिवसेना नेते रावसाहेब खेवरे  वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक संतोष चोळके तसेच राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रामदास बाचकर, यशवंत सेनेचे जिल्हाअध्यक्ष विजय तमनर, आदींसह मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आधार फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा राधिकाताई खेमनर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *