नागेबाबा मल्टिस्टेटकडून मयत सभासदाच्या वारसाला १० लाखांचा धनादेश

राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट सहकारी संस्थेच्या सभासद सुरक्षा कवच योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू झालेल्या सभासदाच्या वारसाला १० लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. या उपक्रमामुळे दुःखाच्या प्रसंगी संबंधित कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.

श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट संस्था वर्षाचे ३६५ दिवस ग्राहकांना सेवा देत असताना केवळ आर्थिक क्षेत्रापुरते कार्य मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवत आहे. संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रातही संस्था उल्लेखनीय काम करत आहे.

संस्थेच्या ‘नागेबाबा सभासद सुरक्षा कवच’ योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास सभासदांच्या वारसांना १० लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत, तर अपघातग्रस्त सभासदांना ५ लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय खर्च दिला जातो. या योजनेमुळे संकटाच्या काळात सभासदांच्या कुटुंबांना आर्थिक आधार मिळत आहे.

राहुरी शाखेचे खातेदार सभासद कै. दत्तात्रय अंबादास चव्हाण यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होते. त्यांनी सुरक्षा कवच योजनेत नोंदणी केली असल्याने त्यांच्या वारसाला नागेबाबा मल्टिस्टेटच्या वतीने १० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. कै. चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

यावेळी तांदुळवाडीचे सरपंच विराज धसाळ, उपसरपंच ज्ञानेश्वर खिलारी, गणपत पेरणे, माळी सर, रवींद्र पेरणे, एम. एस. पेरणे, कानिफनाथ धागोडे, अभिजित पेरणे, प्रसाद पेरणे, आबासाहेब पेरणे, सतीश वडीतके, विक्रम पेरणे, बाबासाहेब पेरणे, अमर मोरे, वैभव कोकाटे, अंकुश देशमुख, संतोष गाडेकर, चव्हाण कुटुंबीय, ग्रामस्थ तसेच नागेबाबा परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *