मोदी सरकारच्या १२ वर्षाच्या यशस्वी वाटचालीनिमित्त आ.अक्षय कर्डिले कडून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

नागरदेवळे  : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीनिमित्त नागरदेवळे-बुऱ्हानगर परिसरात वृक्षारोपण व स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले. भाजपा आमदार अक्षय कर्डिले यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनासह सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.

मोदी सरकारच्या विकासाभिमुख व जनकल्याणकारी धोरणांना अभिवादन करत विविध ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली. तसेच परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करत कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. या उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी आमदार अक्षय कर्डिले म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून देशसेवा करत आहेत. गेल्या १२ वर्षांत गरीब, शोषित, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे ऐतिहासिक कार्य मोदी सरकारने केले आहे. विकसित भारताच्या दिशेने देशाची वाटचाल वेगाने सुरू असून जनतेचा विश्वास हीच या यशाची खरी ताकद आहे.’’

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मोदी सरकारची १२ वर्षे : विश्वास, विकास आणि जनकल्याण’ या अभियानांतर्गत ५ ते २१ जूनदरम्यान राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली. या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक बूथ स्तरावर वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमात सरपंच राम पानमळकर, उपसरपंच सोनू भुजबळ, राहुल पानसरे, अनिल करंडे, संतोष म्हस्के, सुधीर भापकर, बीडीओ देसले, अण्णा चौधरी, दत्ता तापकिरे, महेश झोडगे, रावसाहेब कर्डिले, रवी कर्डिले, सागर बनकर, मयूर पाखरे, अजय गारदे, सुरेंद्रसिंग घारू, मंजाबाप्पू घोरपडे, भाऊसाहेब ठोंबे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि जनजागृतीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे परिसरात स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *