राहुरी खुर्दमध्ये पाणीप्रश्न पेटला महिलांनी ग्रामपंचायतला ठोकले टाळे

राहुरी, प्रतिनिधी : राहुरी खुर्द येथे तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावरून संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकत आंदोलन केले. अनेक दिवसांपासून गावात नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.”जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप उघडू देणार नाही,” असा इशारा महिलांनी दिला. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच व काही सदस्य अनुपस्थित असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.महिलांनी सांगितले की, नियमित पाणीपट्टी भरूनही दोन-दोन दिवस नळाला पाणी येत नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, “१४ गाव पाणीपुरवठा योजनेची टाकी पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे,” असे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले. मात्र ग्रामस्थांनी हे कारण फेटाळून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.या आंदोलनात जयश्री गाडे, मनिषा कारंजकर, स्वाती पवार, कविता पेंडभाजे, चंद्रकला खोजे, वैशाली क्षिरसागर, माया क्षिरसागर, शम्मू शेख, छाया मेहेत्रे, हेमा लालबागे, अर्पणा पवार, सुनंदा मोरे, मंगला कोरके, अनिता डोंगरे, नंदिनी डफळ, मंगला सांगळे, पूजा जाधव, सारिका वाकचौरे, रंजना दातीर, उमा मेहेत्रे, हौसाबाई चांदणे, सकुबाई चांदणे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.वेळी ग्रामविकास अधिकारी प्रभाकर चव्हाण, शिवाजी शेंडे, शौकत इनामदार, आयुब पठाण तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *