राहुरी ग्रामीण रुग्णालयात तीन सुखरूप प्रसूती

राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : ग्रामीण रुग्णालय, राहुरी येथे नुकत्याच तीन प्रसूती यशस्वीरीत्या पार पडल्या. तिन्ही नवजात बालके आणि त्यांच्या माता सुखरूप असून, त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने दिली.
प्रसूतीनंतर माता व नवजात बालकांची आवश्यक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांकडून त्यांच्यावर नियमित देखरेख ठेवण्यात आली. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे तिन्ही प्रसूती सुरक्षितपणे पार पडल्या.
या निमित्ताने तिन्ही कुटुंबांचे अभिनंदन करण्यात आले असून, नवजात बालकांना निरोगी आणि उज्ज्वल आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. ग्रामीण भागातील महिलांना सुरक्षित मातृत्वासाठी आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यावर ग्रामीण रुग्णालयाकडून भर दिला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *