अहिल्यानगर : येथील सेवानिवृत्त शिक्षक, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्य-कर्तृत्वावर अपार श्रद्धा असलेले निष्ठावान रयत सेवक, प्रखर पुरोगामी विचारवंत आणि रयत सेवक मित्रमंडळाचे आघाडीचे कार्यकर्ते ढोके प्रल्हाद गणपत (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
ढोके यांनी रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लि., सातारा येथे माजी व्हाइस चेअरमन म्हणून जबाबदारी सांभाळली होती. तसेच अहिल्यानगर जिल्हा ज्युनिअर कॉलेज शिक्षक संघटनेचे माजी सचिव म्हणूनही त्यांनी काम केले. रयत शिक्षण संस्थेच्या विचारधारेचा प्रसार आणि पुरोगामी चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके यांचे ते वडील होत.