प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीबद्दल राहुरीत उद्या विजयी सभा व रॅली

राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे: राज्याचे मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राजक्त तनपुरे यांची अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल राहुरी येथे रविवारी (दि. ७) भव्य विजयी सभा व रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

मार्केट कमिटी, राहुरी येथून सायंकाळी ५ वाजता रॅलीला सुरुवात होणार असून सभेचे आयोजन नवी पेठ येथील जुन्या सरकारी दवाखान्यासमोर करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीचे सर्व आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.या विजयी सभेस नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *