श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील शेंगाळे यांना हवालदारपदी पदोन्नती

श्रीरामपूर : श्रीरामपूर येथील अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेले पोलीस नाईक अनिल शेंगाळे यांना हवालदारपदी पदोन्नती मिळाली आहे. त्यांच्या पदोन्नतीबद्दल कार्यालयात सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

यावेळी श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, पोलीस उपनिरीक्षक धुळे, पोलीस उपनिरीक्षक राजू गोडगे तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी शेंगाळे यांना शुभेच्छा देत पुढील सेवावाटचालीसाठी यशस्वी कारकिर्दीच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *