पर्यावरण दिनानिमित्त सावित्रीबाई फुले विद्यालयात वृक्ष लागवड

राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे :- 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ राहुरी येथे विद्यालयाच्या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. मुख्याध्यापक अरुण 

तुपविहीरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली लावलेल्या सर्व वृक्षांना ट्री गार्ड  लावले जातील प्रत्येक झाड विद्यार्थ्यांना दत्तक दिले जाईल त्याची जोपासना विद्यार्थी व शिक्षकांमारफित करण्यात येईल.

शालेय परिसरात पर्यावरण दिनाचे औचित साधून .जांभूळ, आंबा, पिंपळ ,वड हे वृक्ष लावण्यात आले.

याकरिता एनसीसी विद्यार्थी तसेच एनसीसी अधिकारी संतोष जाधव सर गोकुळ ठाकूर सर,ग्रंथपाल बबन कसाब सर ,वरिष्ठ लिपिक भानुदास आढाव,सुरक्षा रक्षक भरत  नजन

कर्मचारी किशोर बर्डे,यश गांगुर्डे शैलेश परदेशी,नंदकिशोर वाघ यांनी योगदान दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *