खासदार निलेश लंके यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
राहुरी (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या युवक संघटनेत शरफुदीन उस्मान पठाण यांची राहुरी तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर शिवाजी निमसे यांनी नियुक्तीपत्राद्वारे ही नियुक्ती जाहीर केली. खासदार निलेश लंके यांच्या हस्ते पठाण यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या पुरोगामी विचारांचा आणि पक्षाच्या ध्येयधोरणांचा प्रसार करत संघटना मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील अनुभवाचा उपयोग करावा, अशी अपेक्षा नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, खासदार निलेश लंके, आमदार रोहित पवार आणि युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पठाण यांनी पक्ष संघटनेचे काम अधिक प्रभावीपणे करावे, अशा शुभेच्छा जिल्हाध्यक्ष रामेश्वर निमसे यांनी दिल्या.
या नियुक्तीमुळे मोमिन आखाडा परिसरासह राहुरी तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.