अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी सुनिल भुजाडी

उपाध्यक्षपदी प्रभाकर मकासरे,समर्थ वाकचौरे; कार्याध्यपदी श्रीकांत जाधव, सचिवपदी राजेंद्र परदेशी

मावळते अध्यक्ष रफिक शेख यांची जिल्हा कार्यकारिणीवर निवड 

राहुरी प्रतिनिधी –

                पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या  अखिल  भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी सुनिल भुजाडी,उपाध्यक्षपदी प्रभाकर मकासरे व समर्थ वाकचौरे , सचिवपदी राजेंद्र परदेशी,खजिनदारपदी अशिष संसारे,संघटकपदी रमेश खेमनर, कार्याध्यपदी श्रीकांत जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तर मावळते अध्यक्ष रफीक शेख यांना जिल्हा कार्यकारिणी वर संधी देण्यात आली असल्याचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी सांगितले.

          पञकार हल्ला कृती समितीचे उत्तर नगर जिल्हा समन्वयक राजेंद्र उंडे, जिल्हा कोषाध्यक्ष रियाजभाई शेख,जिल्हा कार्याकारिणी सदस्य आकाश येवले,यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळते अध्यक्ष रफीक शेख यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेच्या राहुरी तालुका नूतन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.

        मराठी पत्रकार परिषदेचे सल्लागार व मार्गदर्शक निसार सय्यद,संजय कुलकर्णी,सुधाकर कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली   राहुरी तालुकाध्यक्षपदी सुनिल भुजाडी,उपाध्यक्षपदी प्रभाकर मकासरे व समर्थ वाकचौरे, सचिवपदी राजेंद्र परदेशी, कार्याध्यपदी श्रीकांत जाधव, खजिनदारपदी अशिष संसारे,संघटकपदी रमेश खेमनर,प्रसिद्धी प्रमुख जालिंदर ढोकणे, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

      या नूतन कार्यकारिणीत सदस्य म्हणुन रफीक शेख,रियाज देशमुख,बाळासाहेब दातीर,समीर शेख,बंडू म्हसे,आकाश येवले,शक्कुरभाई तांबोळी,नानासाहेब उंडे,जालिंदर अल्हाट,सुरेश तरकसे,राजेंद्र आढाव, मनिष पटेकर, शरद पाचारणे,मनोज साळवे,सुभाष आग्रे,महेश कासार आदींचा समावेश करण्यात आला आहे.

             नूतन पदाधिकारी कार्यकारीणीचे  अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, अध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष गोपी लांडगे, प्रदेश प्रतिनिधी सुनिल नवले, डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे,उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य,

सरचिटणीस रोहित टेके,जिल्हा उपाध्यक्ष दिलीप खरात,सोमनाथ कचरे व रवी भागवत, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रकाश आरोटे,

दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे उत्तर जिल्हा  जिल्हा निमंत्रक गुरुप्रसाद देशपांडे,जिल्हा समन्वयक राजेंद्र उंडे,डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *