उंबरे येथे भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश; युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या उपस्थितीत अनेकांनी केला प्रवेश

राहुरी वेब प्रतिनिधी, (शरद पाचारणे) –

उंबरे येथे विविध मान्यवरांसह युवकांनी मोठ्या संख्येने पक्षात प्रवेश केला. युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला असून, यामुळे स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले आहे. या वेळी बाबासाहेब ढोकणे, दत्तात्रय ढोकणे (सचिव), विठ्ठल ढोकणे, गाडगे बाळासाहेब, सुयभान नाना ढोकणे, छगन दुशिंग, सुधाकर ढोकणे, केरू ढोकणे, नाना भाऊ दुशिंग, अशोक शिरसागर, बाबासाहेब दुशिंग, मच्छिंद्र ढोकणे, राजेंद्र ढोकणे आदींनी पक्षात प्रवेश केला.तसेच युवा वर्गातून तुषार दुशिंग, सत्यजित ढोकणे, अक्षय ढोकणे, विशाल खंडागळे, समर्थ ढोकणे, ओम ढोकणे, वैभव खंडागळे, मयूर ढोकणे, भैया ससे, महेश साबळे, यश आडसुरे यांचाही उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.

 अक्षय कर्डिले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही वर्षांत विविध विकासकामांच्या माध्यमातून देशाची प्रतिमा जागतिक स्तरावर उंचावली आहे.  निवडणूक सुरू असल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सजग राहून काम करण्याची गरज आहे. आपण गेल्या काही वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा नागरिकांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे. केवळ गोड बोलून मते मिळत नाहीत, तर नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन, केंद्र व राज्य सरकारच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही जनतेसाठी जीवाचे रान करून काम करतो. त्यामुळे केलेल्या कामांची आठवण नागरिकांना करून देणे ही काळाची गरज आहे, असेही कर्डिले यांनी नमूद केले या पक्षप्रवेशामुळे उंबरे परिसरात पक्षाची ताकद वाढली आहे असे मत अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *