बुवासाहेब महाराज यात्रा कमेटीच्या अध्यक्षपदी गेणूभाऊ तोडमल तर उपाध्यक्षपदी गणेश भांड व सागर शिंदे यांची निवड

राहुरी वेब प्रतिनिधी, (शरद पाचारणे ):

राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील जागृत देवस्थान बुवासाहेब महाराज यात्रा कमेटीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नागरीक गेणूभाऊ तोडमल यांची तर उपाध्यक्षपदी गणेश भांड व सागर शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. खजिनदार पदी भाऊराव शेडगे यांची सह खजीनदारपदी साहेबराव मोरे यांची निवड करण्यात आली.

    राहुरी खुर्द येथील जागृत देवस्थान बुवासाहेब महाराज यांच्या यात्रा कमेटीच्या उत्सव समितीच्या कार्यकरिणी नेमणुकीच्या नियोजन बैठकीचे आयोजन  बुवासाहेब मंदिराच्या सभामंडपात करण्यात आले होते, या बैठकीचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरीक मारुती शेडगे हे होते यावेळी साहेबराव मोरे यांनी मागील वर्षाच्या हिशोबाचे वाचन करून शिल्लक रक्कमेचे ग्रामस्था समोर वाचन करण्यात आले. त्यानंतर यात्रा कमेटीची कार्यकारिणी सर्वानुमते ठरवून वरील निवडी जाहीर करण्यात आली. 

      यावेळी युवक वर्गाकडून डीजे   वाजवण्याची परवानगी मिळवण्यासाठी यात्रा कमेटीने सहकार्य करावे अशी मागणी करण्यात आली.अध्यक्ष गेणूभाऊ तोडमल यांनी पारंपरीक वाद्य म्हणजे सनई, डोल ताशा, झांज पथक, बॅन्ड पथक आदि वाद्य वाजविण्याचा आग्रह करुण डीजेसाठी पोलीस विभागाच्या परवानगीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रस्ताविक डॉ. तनपुरे सह साखर कारखान्याचे माजी संचालक नंदकुमार डोळस यांनी आभार मानले अध्यक्ष गेणूभाऊ तोडमल यांनी जत्रा शांततेत पार पाडावी त्यांचे मत मांडले, बैठकीत ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र शेटे, राम तोडमल, अमोल डोळस, यांसह ज्येष्ठ नागरीक साहेबराव धोत्रे, निसारभाई शेख, ज्ञानदेव तोडमल, भगवान बाबा पतसंस्थेचे चेअरमन श्री दिलीपराव आघाव, पप्पू पाटोळे, उमाकांत घोरपडे, आकाश शेटे, सुनिल कुमावत, बाबासाहेब पोपळघट, गोरख ससाणे, प्रशांत डोळस,चेतन घोरपडे, यश गोल्हार, निखिल राऊत, बबलू पाटोळे, आशुतोष खाचणे, राजेंद्र खोजे, सुनिल तोडमल, एकनाथ माळी ,दिलीप क्षीरसागर, प्रशांत चोपडे  मनोज गरड,संजय डोळस, यांसह पत्रकार भिमराज गुंड अशोक मंडलिक, यांसह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *