राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : श्री संत नागेबाबा मल्टिस्टेटच्या सभासद सुरक्षा कवच योजनेअंतर्गत अपघाती निधन झालेल्या कै. संजय राधाकिसन डोंगरे यांच्या वारसांना पाच लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. राहुरी शाखेच्या वतीने सभासद व मान्यवरांच्या उपस्थितीत हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे यांच्या संकल्पनेतून सभासद सुरक्षा कवच योजना राबविण्यात येत आहे. आर्थिक व्यवहारांसोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने संस्था धार्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही विविध उपक्रम राबविते. तसेच सभासदांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीही संस्थेकडून प्रयत्न केले जातात.
संस्थेच्या या योजनेअंतर्गत सभासदाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. तसेच अपघात झाल्यास उपचारांसाठी दोन लाख रुपयांपर्यंत रुग्णालयीन खर्चाची मदत देण्यात येते. सभासदाच्या कुटुंबावर संकट ओढवल्यास त्यांना आर्थिक आधार मिळावा, हा या योजनेमागील उद्देश आहे.
कै. संजय डोंगरे यांनी या योजनेत नोंदणी केली होती. त्यांच्या अपघाती निधनानंतर संस्थेच्या वतीने त्यांच्या वारसांना पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. या उपक्रमातून संस्थेने सभासदांच्या कुटुंबीयांप्रती सामाजिक बांधिलकी जपल्याची भावना व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमास नागेबाबा परिवारातील सभासद, मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.