श्री क्षेत्र गोदावरी धाम येथे गुरुपौर्णिमा व्यासपूजन उत्सवाचे आयोजन

श्रीरामपूर  –

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेट सराला येथील श्री क्षेत्र गोदावरी धाम येथे आषाढ पौर्णिमा (गुरुपौर्णिमा) निमित्त व्यासपूजन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे.

या निमित्ताने गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी महाराज (मठाधिपती, सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज संस्थान, श्रीक्षेत्र गोदावरी धाम, बेट) यांचे सुश्राव्य प्रवचन आयोजित करण्यात आले असून, भाविकांना अध्यात्म, गुरुतत्त्व आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन मिळणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजन सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज संस्थान, श्री क्षेत्र गोदावरी धाम, बेट सराला, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर यांच्या वतीने करण्यात आले आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून व्यासपूजन, प्रवचन व दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *