फलटण :
श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या हजारो वारकरी भाविकांच्या सेवेसाठी डराडो (DARADO NGO) परिवाराने यंदाही पुढाकार घेतला आहे. पालखी मार्गावरील वारकऱ्यांना चहा, बिस्किटे, स्वच्छ पिण्याचे पाणी तसेच अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प संस्थेने केला असून, या सेवाकार्यात नागरिकांनी स्वेच्छेने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
संस्थेच्या वतीने नागरिकांना रोख देणगीबरोबरच पाण्याच्या बाटल्या, बिस्किटांचे पुडे, चहा साहित्य, साखर, दूध तसेच इतर आवश्यक वस्तूंचेही योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देणगीची रक्कम मोठी किंवा छोटी यापेक्षा संतसेवेची भावना महत्त्वाची असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.
हजारो वारकऱ्यांच्या सेवेसाठी मिळणारे प्रत्येक योगदान थेट उपयोगी पडणार असून, देणगी देताना संबंधित बारकोड हा संस्थेचाच असल्याची खात्री करूनच देणगी द्यावी, जेणेकरून ती योग्य ठिकाणी पोहोचेल आणि पारदर्शकता कायम राहील, असेही आवाहन करण्यात आले आहे.
डराडो (DARADO NGO)च्या संचालिका ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी, “माऊलींची सेवा हीच मानवसेवा असून, प्रत्येकाने आपल्या कष्टाच्या कमाईतील छोटासा वाटा या पुण्यकार्यासाठी द्यावा,” असे आवाहन केले आहे.
संपर्क :
ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात
डायरेक्टर, डराडो (DARADO NGO)
मो. : ९१७५२ ८११९०