राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : मुळा धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे धरण काठावरील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे शेतीसाठी तसेच पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण होते.
या प्रश्नाची तातडीने दखल घेत विधान परिषदेचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. पालकमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत मुळा धरण प्रशासनाशी समन्वय साधला. त्यानंतर धरण काठावरील सर्व गावांतील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी दररोज दोन तास सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असून पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे धरण काठावरील गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असू
न पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्णयाबद्दल शेतकऱ्यांनी त्यांचेआभार व्यक्त केले आहेत. तसेच आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पाठपुरावा केल्याने त्यांचे देखील शेतकऱ्यांनी आभार व्यक्त केले.