राहुरीत ठाकरे गटाला मोठा धक्का; तालुकाप्रमुख सचिन म्हसे यांचा भाजपमध्ये प्रवेश

राहुरी, दि. ६ एप्रिल , वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे )– राहुरी तालुक्यातील राजकीय घडामोडींना सोमवारी नवे वळण मिळाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे राहुरी तालुका प्रमुख सचिन जालिंदर म्हसे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, आमदार संग्राम जगताप तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
या प्रवेशावेळी अमित भागवत, विजय ठुबे, भीमराज म्हसे, मधुकर म्हसे, नाथा कर्डिले, आप्पासाहेब म्हसे, राकेश म्हसे, लक्ष्मण घाडगे, दीपक घाडगे, बाबा गाडे, रविराज दौले, दत्ता शिंदे, विवेक ढसाळ, कृष्णा म्हसे, सौरभ भालेराव, आकाश कोळसे, संदीप शिंदे, अक्षय काळे, किरण डौले, चैतन्य म्हसे, पोपट खुळे, दिगंबर कदम, पप्पू जाधव, लखन कानडे, जयेश म्हसे, संतोष म्हसे, सुदर्शन म्हसे, सुरेश म्हसे, भागवत मोरे, शुभम म्हसे, शिवम कोकाटे, मयूर ढसाळ, कमलेश परदेशी, अभिषेक कोळसे, शुभम कोळसे, हरी कोळसे, अमोल बर्डे, हर्षद कोळसे, विशाल कोळसे, अमोल कोळसे, नारायण घाडगे, बंडू घाडगे, मच्छिंद्र दिवे, गोपीनाथ बर्डे, चैतन्य भांड आदी कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.यावेळी बोलताना सचिन म्हसे म्हणाले, “राहुरी तालुक्यातील विकासकामे मार्गी लागावीत, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न प्रभावीपणे सोडवता यावेत आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षांना न्याय देता यावा, यासाठी त्यांच्या आग्रहाखातर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. पक्ष जी जबाबदारी देईल ती पूर्ण ताकदीने आणि यशस्वीपणे पार पाडू.”
ऐन राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या राजकीय प्रवेशामुळे तालुक्यात चर्चांना उधाण आले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख असलेले सचिन म्हसे यांनी भाजपची वाट धरल्याने ठाकरे गटाला मोठे खिंडार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राहुरी तालुक्यात आधीच पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असताना सचिन म्हसे यांच्या या निर्णयामुळे स्थानिक समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे त्यांच्या सोबत मोठ्या प्रमाणात युवक आणि ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपची संघटनात्मक ताकद वाढल्याचे मानले जात आहे.
हाच प्रवेश आगामी निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती राजकीय फायदा करून देतो, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *