राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे ) – विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त जय भीम मित्र मंडळाने राज्यस्तरीय काव्य स्पर्धा आयोजित केल्या आहेत, अशी माहिती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विलास नाना साळवे यांनी दिली.शुक्रवार दिनांक 10 एप्रिल ला राजवाडा या ठिकाणी भीम काव्य स्पर्धा सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहेत.स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना प्रथम पारितोषिक रुपये 2101/- सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,द्वितीय पारितोषिक रुपये 1501 सन्मान चिन्ह,सन्मानपत्र, तृतीय पारितोषिक 1001 सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,उत्तेजनार्थ दोन पारितोषिके रुपये 500 सन्मान चिन्ह, सन्मानपत्र देण्यात येणार आहेत.सहभागी सर्व कवींना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे.सर्व कवींना जयभीम मित्रमंडळाच्या वतीने अल्पोपहार व चहा दिला जाणार आहे.या स्पर्धेसाठी नामांकित कवी देवदत्त सूर्यवंशी उपस्थित राहणार असून स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.कातोरे(बेलवंडी)प्रा. होन(टाकळीमिया) कवयित्री मनीषा पटेकर कोल्हार हे राहणार आहेत.स्पर्धेसाठी नाममात्र नोंदणी फी रुपये 50 ठेवलेली असून स्पर्धेत कवींची संख्या 60 एवढी मर्यादित ठेवण्यात आली आहे.ज्यांना स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी आपले नाव व फी श्री अनुसंगम शिंदे सरांकडे (9503959957) देऊन नोंदणी करावी.सादर करण्यात येणारी कविता स्वरचित व स्वलिखित असावी. ऐनवेळी नोंदणी केली जाणार नाही,त्यामुळे लवकरात-लवकर नोंदणी करण्याचे आवाहन जयभीम मित्र मंडळाने केले आहे.