राहुरीत मोफत स्त्रीरोग व कॅन्सर निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

राहुरी, वेब प्रतिनिधी शरद पाचारणे दि. २१ मार्च :

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राहुरी येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत स्त्रीरोग व कॅन्सर निदान शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आप्पासाहेब ढूस मित्र मंडळ, साऊ एकल महिला समिती, राहुरी तालुका वात्सल्य समिती, एसबीआय फाउंडेशन (मुंबई), डॉ. माने मेडिकल फाउंडेशन, युगंधरा सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान (राहुरी) तसेच सहारा फाउंडेशन (देवळाली प्रवरा) यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले.

संत गाडगे महाराज आश्रम शाळा, राहुरी येथे शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ओम शांती केंद्राच्या नंदा दीदी यांच्या हस्ते फीत कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

राहुरी पंचक्रोशीतील एकल व गरजू महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तपासणी करून घेतली. तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग व कॅन्सर तपासण्या करण्यात आल्या.

दरम्यान, दि. २२ मार्च रोजी राहुरी फॅक्टरी येथील डी पॉल स्कूलमध्येही महिलांसाठी मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या संधीचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.उद्घाटन प्रसंगी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस, श्री व सौ. विद्याताई करपे, सौ. वर्षा पाटील, नंदा दीदी, गणेश भालके, बाळासाहेब सगळगिळे, डॉ. वैशाली बल्लाळ, डॉ. ऐश्वर्या आरंगळे, डॉ. हर्षदा पवार, तसेच वैद्यकीय कर्मचारी व स्वयंसेवक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *