ताजनापूर उपसा सिंचन योजनेच्या तिसर्या टप्प्याच्या सर्व्हेक्षणासाठी ६३लाख रुपयांचा निधी-ना.विखे पाटील

अहील्यानगर दि.२६ प्रतिनिधी

शेवगाव पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या ताजनापूर उपसा सिंचन योजनेच्या तिसर्या टप्प्याच्या कामाचे सर्व्हेक्षण आणि अन्य कामाकरीता   ६३लाख  रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.आ.मोनिका राजळे यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा एकच पुनरुज्जीवन करण्यासाठी  यांत्रिकी विद्युत व स्थापत्य कामासाठी २०कोटी ८८लाख रुपयांच्या कामास आजच्या बैठकीत मंजूरी देण्यात असून,या कामामुळे शेवगाव तालुक्यातील आठ गावांमधील सुमारे २हजार ७४४हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे.योजनेच्या टप्पा क्र एक विस्तारीत मध्ये १३ गावांचा समावेश करण्यात आला असून, या प्रस्तावामध्ये २४०कोटी रुपयांची तरतूद असून प्रशासकीय मान्यता तसेच  तातडीने काम सुरू होण्याच्या दृष्टीने  कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले.

योजनेच्या कामामुळे शेवगाव तालुक्यातील ९६बंधारे तलाव भरून देण्यासाठी मोठी मदत होईल.यामाध्यमातून ९१७ हेक्टर क्षेत्रासाठी सिंचनाची मदत होईल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

ताजनापूर उपसा सिंचन योजनेच्या तिसर्या टप्पा शेवगाव पाथर्डी तालुक्याकरीता ऐतिहसिक ठरणार असून,वर्षानुवर्ष दुष्काळाच्या सावटाखाली राहीलेल्या गावांना योजनेचा तिसरा टप्पा या गावांमधील शेतकऱ्यांच्या जीवनातील अमूलाग्र बदल करणारा ठरेल.पुर्व भागातील गावांमधील नदी बंधारे पाझर तलाव नाला बंडीग यामध्ये शेतीसाठी पाणी सोडण्याचे नियोजन नियोजित असून,योजनेच्या सर्व्हेक्षणासाठी व अन्वेषणाच्या कामासाठी ६३लाख  २७ हजार रूपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून याची निविदा प्रक्रीया पूर्ण करून सर्व्हेक्षणाच्या कामाला सुरूवात करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी आजच्या बैठकीत दिल्या.मंत्री विखे पाटील यांनी शेवगाव येथे टंचाई आढावा बैठकीत ताजनापूर उपसा सिंचन योजनेच्या तिसर्या टप्प्याच्या कामा संदर्भात शेतकऱ्यांना आश्वासित केले होते.त्याच्या कार्यवाहीला प्राधान्य देवून योजनेसाठी प्रशासकीय स्तरावर अवघ्या काही महीन्यात कार्यवाही सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *