योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर येथील व्ही.आय.पी. सर्किट हाऊसमध्ये प्रवेश सोहळा उत्साहात
अहिल्यानगर : वंचित बहुजन आघाडीचे अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली संदीप जिजाबा ठोंबे आणि त्यांच्या मित्रपरिवाराने वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. अहिल्यानगर येथील व्ही.आय.पी. सर्किट हाऊस येथे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हा प्रभारी ज्ञानेश्वर कवठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.
या वेळी संदीप जिजाबा ठोंबे, डॉ. भालचंद्र साळवे, योगेश शिंगाडे, सागर देठे, दत्ता सोनटक्के, वैभव सावंत, आशिष खरात, ईश्वर पाटीदार, दिनेश देवळ, ऋषी पवार, प्रकाश शिंदे, विठ्ठल जाधव, गौरव काळे, कार्तिक शिंदे, कुंदन जबरे, सूरज पवार, संदेश केदारे, अनिल विधाते, ऋतुराज अडागळे, अशोक पठारे, अण्णाभाऊ भिंगारदिवे आणि कल्याण सिताराम घोडके यांनी पक्षात प्रवेश केला. नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे निळे उपरणे घालून स्वागत करण्यात आले.
यावेळी जिल्हा प्रभारी ज्ञानेश्वर कवठेकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष योगेश साठे, नगर तालुकाध्यक्ष रविकिरण जाधव आणि शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख यांनी नवप्रवेशित कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेनुसार समाजातील वंचित, उपेक्षित आणि तळागाळातील घटकांच्या प्रश्नांसाठी संघटितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या पक्षप्रवेशामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.