देव मोटर टाटा मोटर्सचा उपक्रम; CMEGP योजनेतून युवकांना रोजगाराची संधी
राहुरी (प्रतिनिधी) : दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर राहुरी येथील देव मोटर टाटा मोटर्सच्या वतीने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत (CMEGP) ३५ टक्के शासकीय अनुदानावर दोन ‘टाटा एस प्रो ईव्ही’ व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहनांचे वितरण करण्यात आले. दिलीप धामोरे आणि अविनाश डफळ या ग्राहकांना देव मोटरचे संचालक देवेंद्र लांबे पाटील यांच्या हस्ते वाहनांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.
सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा देव मोटरचा प्रयत्न आहे. याच उद्देशाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत ग्राहकांना ३५ टक्के अनुदानाचा लाभ मिळवून देत ही वाहने वितरित करण्यात आली.
टाटा एस प्रो ईव्ही हे इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहन एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर सुमारे १५० किलोमीटरपर्यंत धावू शकते. इंधन खर्चात बचत, कमी देखभाल खर्च आणि प्रदूषणमुक्त प्रवास ही या वाहनाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे व्यावसायिक वाहतुकीसाठी हे वाहन फायदेशीर ठरू शकते.
‘देव मोटर्सचा विश्वास… समाधानी ग्राहक’ हे ब्रीदवाक्य जपत देव मोटरच्या माध्यमातून ग्राहकांना वाहन विक्रीबरोबरच शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शनही केले जात आहे. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन व्यावसायिक प्रवास सुरू करणाऱ्या दिलीप धामोरे आणि अविनाश डफळ यांचे देव मोटर परिवाराच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.