राहुरीत एसबीआय शाखेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसादडॉ. तनपुरे कारखाना संचलित स्वामी विवेकानंद नर्सिंग होम आयुर्वेद महाविद्यालयाचा उपक्रम

राहुरी प्रतिनिधी शरद पाचारणे : स्टेट बँक ऑफ इंडिया, राहुरी शाखा आणि डॉ. तनपुरे कारखाना संचलित स्वामी विवेकानंद नर्सिंग होम आयुर्वेद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी बाजार समितीलगत असलेल्या एसबीआय शाखेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले.
या शिबिरात रक्तगट, नाडी गती, रक्तातील साखर, डोळे, कान, सामान्य शारीरिक तपासणी तसेच संधिवात व अन्य आजारांची तपासणी करण्यात आली. आयुर्वेद महाविद्यालयाच्या तज्ज्ञ डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी नागरिकांची तपासणी करून आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
स्टेट बँकेचे ग्राहक, ठेवीदार तसेच परिसरातील नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी बँकेचे शाखा अधिकारी सुनील पवार, अंजूम पठाण, रविशंकर बिलोरे, अतुल बंगाळ, वंदना वाघ यांच्यासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच आयुर्वेद महाविद्यालयाच्या डॉ. अपर्णा खपके, डॉ. ऋतिका सुरतकर, डॉ. आकाश हजारे, डॉ. तेजस माखाडे, डॉ. ऋषिकेश यदमाळ आणि ब्रदर बापू बलमे यांनी आरोग्य तपासणीसाठी योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *