धनादेश न वटल्या प्रकरणी साई आदर्श मल्टिस्टेटच्या कर्जदारास शिक्षा

राहूरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे – राहुरी येथील साई आदर्श मल्टीस्टेट संस्थेच्या शाखेतून वरवंडी, तालुका राहुरी येथील फिरोज रशिद शेख यांनी ७५ हजार रुपये कर्ज घेतले होते. सदर कर्जाची परतफेड ठरल्याप्रमाणे वेळेत केली नाही थकबाकी झाली तेव्हा संस्थेचे कर्मचारी वसुलीसाठी गेले असता कर्जदाराच्यावतीने वडील या नात्याने रशीद उस्मान शेख यांनी स्वतःच्या खात्यातील भारतीय स्टेट बँक शाखा अहमदनगरचा धनादेश क्रमांक २५ ५७ ८७ रक्कम रुपये १०३०००/- (एक लाख तीन हजार) चा धनादेश देऊन वटण्याची हमी व भरोसा दिला व कर्जापोटी रक्कम घेऊन जाण्यास सांगितले. परंतु सदरचा धनादेश वटला नाही म्हणून फिर्यादी साई आदर्श संस्थेच्या वतीने अहिल्यानगर येथील न्यायालयात नि.इ. अॅक्ट १३८ नुसार फौजदारी दाखल केली. सदरची फिर्याद मे.न्यायालयात गुणदोषावर सुनावणी झाली सदर सुनावणीचे वेळी साई आदर्श संस्थेच्या वतीने किरण रसाळ यांची साक्ष नोंदवण्यात आली व त्यावेळी साई आदर्श संस्थेच्या वतीने आवश्यक ती योग्य कागदपत्रे न्यायालयात दाखल करण्यात आली. फिर्यादी संस्थेचे रसाळ यांची साक्ष दाखल केलेली कागदपत्रे व आलेला पुरावा ग्राह्य धरून आरोपी रशीद उस्मान शेख यास रुपये १३००००/- (एक लाख तीस हजार) नुकसान भरपाई व ती न भरल्यास दोन महिने शिक्षा असा आदेश केलेला आहे. सदरचा निकाल अहिल्यानगर येथील दिवाणी फौजदारी मा. न्यायमूर्ती श्रीमती प्र.तु.शेजवळ – काळे यांनी दिला आहे. फिर्यादी पतसंस्थेच्या वतीने मे.न्यायालयात अक्षय दिलीप शेळके यांनी काम पाहिले त्यांना एडवोकेट दिलीप शेळके पाटील व प्रिया काळे यांनी सहाय्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *