दीपक रामजी साळवे यांची वृक्ष प्राधिकरण समितीवर नियुक्ती 

राहुरी प्रतिनिधी शरद पाचारणे : राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना करण्यात आली असून, समितीच्या सदस्यपदी दीपक रामजी साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियमाच्या अनुषंगाने ही समिती कार्यरत राहणार आहे.

नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा वृक्ष प्राधिकरण समितीच्या अध्यक्ष विद्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे कामकाज चालणार आहे. समितीच्या उपाध्यक्षपदी डॉ. उषाताई प्रसादराव तनपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदस्य म्हणून बबन कोंडीराम गुलदगड, आकाश बाबासाहेब येवले आणि दीपक रामजी साळवे यांचा समावेश आहे. शंकर रामनाथ आगलावे हे समितीचे सचिव तथा वृक्ष अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

राहुरी शहरातील वृक्षसंपदेचे संरक्षण व संवर्धन, वृक्षतोडीवर नियंत्रण, वृक्षांचे संगोपन तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी समितीच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. शहरातील हरित क्षेत्र वाढविण्यासह वृक्षसंवर्धनाच्या दृष्टीने समिती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

दीपक साळवे यांच्या नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात त्यांच्या माध्यमातून प्रभावी योगदान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

समितीची रचना

अध्यक्ष : विद्या पाटील — मुख्याधिकारी तथा अध्यक्ष

उपाध्यक्ष : डॉ. उषाताई प्रसादराव तनपुरे

सदस्य : बबन कोंडीराम गुलदगड

सदस्य : आकाश बाबासाहेब येवले

सदस्य : दीपक रामजी साळवे

सचिव तथा वृक्ष अधिकारी : शंकर रामनाथ आगलावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *