रुग्णसेवेसह सामाजिक कार्याची दखल; डॉ. वृषाली शेळके यांची डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल अवॉर्डसाठी निवड

राहुरी : रुग्णसेवेला सामाजिक बांधिलकीची जोड देत वैद्यकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या राहुरी येथील लाइफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. वृषाली गणेश शेळके यांची प्रतिष्ठित डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल अवॉर्ड-२०२६ साठी निवड झाली आहे.

डॉ. वृषाली शेळके यांनी अल्पावधीतच रुग्णसेवेच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. रुग्णांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देत त्या कायम तत्पर असतात. रुग्णांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य उपचार व मार्गदर्शन मिळावे, यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात.

वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक आणि धार्मिक कार्याचीही त्यांना विशेष आवड आहे. समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. रुग्णसेवा ही केवळ व्यवसाय नसून सामाजिक बांधिलकी असल्याच्या भावनेतून त्यांचे कार्य सुरू आहे.

सामाजिक व सार्वजनिक सेवाक्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारासंदर्भातील मंजुरीपत्र २३ जुलै २०२६ रोजी भारत सेंटर फॉर व्होकेशनल ट्रेनिंग, तामिळनाडू यांच्या वतीने प्रदान करण्यात आले आहे. सार्वजनिक सेवा या श्रेणीत त्यांची निवड झाली आहे.

डॉ. वृषाली शेळके यांच्या रुग्णसेवेतील योगदानाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील कार्याचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे. राहुरीच्या वैद्यकीय क्षेत्रात रुग्णसेवेला मानवी संवेदनशीलतेची जोड देणाऱ्या डॉ. शेळके यांच्या कार्याचा हा सन्मान असल्याची भावना व्यक्त होत असून, त्यांच्या या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *