अस्तगाव : येथील प्रगतशील व्यक्तिमत्त्व, जिल्हा सहकारी बँकेचे माजी शाखाधिकारी तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे विधीतज्ज्ञ अॅड. सुदेश गव्हाणे व अभियंता निलेश गव्हाणे यांचे वडील जिजाबा गणपत गव्हाणे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.
जिजाबा गव्हाणे यांनी सामाजिक व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने गव्हाणे कुटुंबीयांसह नातेवाईक व मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांचा दशक्रिया विधी सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी अस्तगाव येथील सातमोऱ्या येथे होणार आहे.
Excellent explanation and easy to understand. https://traderzo.com/best-ai-models-for-trading-in-2026-gpt-gemini-claude-and-machine-learning-compar/