ब्राह्मणीच्या आदर्श विद्यालयाला चेअरमन अरुण तनपुरे यांची अचानक भेट

ब्राह्मणी, ता. राहुरी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे यांनी सोमवारी (दि. १०) सकाळी ब्राह्मणी येथील आदर्श विद्यालयास अचानक भेट देऊन शाळेच्या कामकाजाचा आढावा घेतला.

शाळेची सकाळची प्रार्थना झाल्यानंतर तनपुरे यांनी शाळेतील कर्मचारी उपस्थिती, स्वच्छता व्यवस्था, विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या शैक्षणिक सुविधा, भविष्यातील गरजा तसेच शाळेच्या जमा-खर्चाबाबत माहिती घेतली. यावेळी त्यांनी उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी चर्चा करून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन केले.

शाळेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करताना तनपुरे यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि वाढती विद्यार्थी पटसंख्या याबाबत समाधान व्यक्त केले. शाळेच्या विकासासाठी सातत्याने लक्ष देणाऱ्या डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका वैशालीताई तारडे यांच्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.

यावेळी शाळेच्या वतीने चेअरमन अरुण तनपुरे यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी संचालिका वैशालीताई तारडे, प्राचार्य मच्छिंद्र बोंबले, उपप्राचार्य श्रीनिवास खर्डे, डॉक्टर बानकर, शाताराम हापसे, सुधीर ठुबे, दत्तात्रय तारडे,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *