उरूसानिमित्त “मल्हारवाडी बनात”धार्मिक कार्यक्रम; उद्या चादर व भव्य भंडारा

राहुरी, वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : राहुरी तालुक्यातील मल्हारवाडी बन येथील हजरत शाहबुल बाबा (हजरत दावल मलिक बाबा) यांच्या उरूसानिमित्त गुरुवार, दि. १६ जुलै २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दावल मलिक दर्गा ट्रस्ट, मल्हारवाडी बन यांच्या वतीने आयोजित या उरूसामध्ये सायंकाळी ७.३० वाजता पवित्र चादर (संदल) अर्पण करण्यात येणार असून त्यानंतर भाविकांसाठी भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या धार्मिक सोहळ्यास बारागाव नांदूर, मल्हारवाडी, मोमीन आखाडा, घोरपडवाडी परिसरातील ग्रामस्थ, भाविक व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तसेच आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार असल्याचे आयोजकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दावल मलिक दर्गा ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

One thought on “उरूसानिमित्त “मल्हारवाडी बनात”धार्मिक कार्यक्रम; उद्या चादर व भव्य भंडारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *