राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच विविध हेल्थ इन्शुरन्स योजनांअंतर्गत पात्र रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राहुरी येथील लाईफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यास मदत होत आहे.
हॉस्पिटलमध्ये थंडी-ताप, मलेरिया, डेंग्यू, निमोनिया, पोटाचे विविध विकार, उष्माघात, लघवीचे आजार, उलटी-जुलाब यांसह अनेक आजारांवर मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच हर्निया, ब्रेस्ट सर्जरी, अपेंडिक्स, डायबेटिक फूट, व्हेरिकोज व्हेन्स, पाइल्स व फिशर, आतड्यांचा अडथळा, थायरॉईड शस्त्रक्रिया, मुतखडा, प्रोस्टेट शस्त्रक्रिया, विविध प्रकारच्या गाठी तसेच हाडांच्या शस्त्रक्रिया यांसह अनेक शस्त्रक्रिया योजनेंतर्गत मोफत करण्यात येत आहेत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांकडे आधार कार्ड व रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. रुग्ण दाखल झाल्यानंतर औषधोपचारासह संपूर्ण उपचार मोफत उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली.
अधिक माहितीसाठी लाईफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मल्हारवाडी रोड, राहुरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क : ९३५६०८६१२०, ८३८१०९१९७५.