राहुरी वेळ प्रतिनिधी शरद पाचारणे –
साक्षरतेचा एकच मंत्र, शिक्षण देणे हेच तंत्र या उक्ती प्रमाणे राहुरी तालुक्यातील सुरू असलेल्या शिवांकुर ग्रुपच्या, शिव प्रतिष्ठान संचलित शिवांकुर विद्यालय कोंढवड, शिवांकुर रेन्बो स्कूल राहुरी, तसेच शिवांकुर विस्डम स्कूल खडांबे या ठिकाणी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
शिवांकुर विद्यालय मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले•
शिक्षण हे माध्यम समाजात बदल घडवून आणण्याचे प्रमुख शस्त्र आहे असे प्रतिपादन संस्थेचे सचिव डॉ. प्रकाश पवार यांनी केले. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले तसेच इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन पुस्तकाचे वाटप करण्यात आले.
प्रसंगी नूतन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ रावसाहेब पवार, विश्वस्त मंगल पवार, डॉ गौरी पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका पांढरे व आभार प्रदर्शन शितल फाटक यांनी केले.
या कार्यक्रमास मुख्याध्यापिका छाया जाधव, पर्यवेक्षक अरुण खिलारी, किरण तारडे, सचिन जाधव, भाऊसाहेब करपे, विजय शिंदे, मयूर धुमाळ, ज्योती शेळके, सुरेखा मकासरे, प्रियंका पांढरे, शितल फाटक, अनिता लांबे, दुर्गा बारवेकर, सुनीता ढोकणे, प्रियंका शेळके, कविता कल्हापुरे, अनिता म्हसे, शिपाई शारदा तमनर, ड्राइवर अशोक गाडे, अविनाश तनपुरे, नवनाथ गाडे, पिनू आहिरे, नंदु गिरी, कैलास गडधे, भैय्यासाहेब चौधरी, अनिल गुंजाळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
नूतन विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रसंगी
शिवांकुर विस्डम स्कुलच्या श्रध्दा सोनवणे, स्वाती लहारे, मनीषा कोकाटे मॅडम, शुभम अहिरे आदींसह अनेक पालक उपस्थित होते.
नूतन विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रसंगी शिवांकुर रेनबो स्कूलच्या कावेरी शेळके, रितु चाकोते, जयश्री देशमुख, शिपाई आरती वाघ आदींसह बहुसंख्य पालक व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते