धर्मवीर बलिदान मासानिमित्त राहुरीत व्याख्यान, रक्तदान शिबिर व मूकपद यात्रा

राहुरी वेब प्रतिनिधी,१६ मार्च ( शरद पाचारणे ) : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाच्या स्मृती जागवण्यासाठी फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन अमावास्येपर्यंत धर्मवीर बलिदान मास पाळला जातो. या निमित्ताने हिंदू ग्रुप राहुरी तालुक्याच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या क्रूर अत्याचारांना न जुमानता हिंदवी स्वराज्यासाठी अतुलनीय बलिदान दिले. त्यांच्या या पराक्रम व बलिदानाच्या स्मरणार्थ समाजात जागर निर्माण करण्यासाठी हा बलिदान मास साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर मंगळवार (दि. १७ मार्च २०२६) रोजी सायंकाळी ६.३० वाजता धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच बुधवार (दि. १८ मार्च २०२६) रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास व छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे रक्तदान शिबिर राहू-केतू मंदिर, शनी चौक, राहुरी येथे होणार असून रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना श्री शिवछत्रपती चरित्र ग्रंथ व रामरक्षा भेट देण्यात येणार आहे.तसेच बुधवार (दि. १८ मार्च) रोजी सायंकाळी ६ वाजता धर्मवीर संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी मूकपद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हा संपूर्ण उपक्रम हिंदू ग्रुप राहुरी तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.हिंदू ग्रुपच्या वतीने दरवर्षी राहुरी तालुक्यात तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करणे, धर्मवीर बलिदान मास ,श्री दुर्गामाता दौड ,रक्तदान शिबिर, गोमातेसाठी चारा, गरजू हिंदू बांधवास मदत असे विविध उपक्रमांचा केले जातात .देव, देश, धर्मासाठी सदैव तत्पर या ते उक्तीप्रमाणे हिंदू ग्रुप राहुरी तालुक्यात काम करत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *